पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. पिंपरीत संभाव्य आघाडी तुटली आहे. पिंपरीतील काँग्रेसने ४० जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी १०० जागांवर आग्रही होते. मंगळवारी रात्री झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस ३२ जागापर्यंत खाली आली. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीसाठी तयारी दर्शवली नाही. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि काँग्रेसचे सचिन साठे यांच्यात आघाडीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला २० जागांची ऑफर दिली, पण काँग्रेस ३० जागांवर अडून राहिले. दरम्यान राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर नाखुश होऊन काँग्रेसने ही आघाडी तुटल्याची घोषणा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in