पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार वा खासदार आता राहिला नसून, हे प्रथमच घडत आहे. दोन वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यातील सनसनाटी विजय आणि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशामुळे नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील तीन जागाही राखणे शक्य झालेले नाही. काँग्रेसवर ओढवलेल्या या परिस्थितीचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वांत जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसचे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपर्यंत एकहाती वर्चस्व होते. २०१४ पासून काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का बसण्यास सुरुवात झाली. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोर मतदारसंघातील एकमेव जागा राखता आली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भोरसह पुरंदरची जागा जिंकून शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात कडवी लढत दिली होती. तसेच, दोन वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला बालेकिल्ल्यात पराभूत करून इतिहास रचला होता.

आणखी वाचा-घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणे! तुमच्या शहरातील घरांच्या सरासरी किमती किती…

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात शहरातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या मतदारसंघांच्या जागा काँग्रेसला मिळाल्या. जिल्ह्यातील २१ पैकी पाच जागा काँग्रेस लढवत असल्याने आणि त्यापैकी तीन जागांवर काँग्रेसचे आमदार असल्याने त्या जागा राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे होते. तर, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी चांगली स्थिती होती. मात्र, शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोन अशा पाचही जागा काँग्रेस उमेदवारांना जिंकता न आल्याने शहर आणि जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. परिणामी, काँग्रेसचे अस्तित्वच पणाला लागले आहे. अंतर्गत गटबाजी, दुफळी या पूर्वी सातत्याने पुढे आली आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसल्याने काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाची विधानसभा निवडणुकीत सव्याज परतफेड करून विजय मिळवला. शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये संधी असूनही अंतर्गत गटबाजीने या जागा गमाविण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना पराभूत करून पुरंदरचे आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप विजयी झाले होते. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होती. शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वैरातून पवार यांनी संजय जगताप यांचे काम केले. त्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांमुळे संजय जगताप यांना पराभूत व्हावे लागले. विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला.

आणखी वाचा-पुण्यातील मांदेडे गावाची शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल! अनोख्या प्रकल्पाविषयी जाणून घ्या…

थोपटे कुटुंबाची ४५ वर्षांची सत्ता संपुष्टात

काँग्रेसचे भोर विधानसभा मदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी यापूर्वी सलग पंधरा वर्षे (तीन वेळा) प्रतिनिधित्व केले होते. ते या वेळी चौथ्यांदा निवडणूक लढवत होते. त्यापूर्वी त्यांचे वडील, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी या मतदारंसघाचे सलग ३० वर्षे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, थोपटे यांच्या पराभवामुळे ४५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. शिवसेना (ठाकरे) पक्षात असलेले आणि निवडणुकीपूर्वी काही दिवस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेले शंकर मांडेकर यांनी त्यांना पराभूत करून धक्कादायक निकालाची नोंद केली.