पुणे : शहरात हेल्मेटसक्तीबाबत विचार करण्यात यावा. हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे.
हेही वाचा >>> सासवडमधील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला; सगळा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांत कैद
हेल्मेट परिधान न केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. शहरात हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी जनजागृती करण्यात यावी. त्यानंतर हेल्मेट वापरणे बंधनकारक करावे. शहरातील वाहतूक समस्या वाढत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे. हेल्मेट वापरल्यास गंभीर दुखापत होत नाही. हेम्लेट वापरणे बंधनकारक आहे. हेम्लेटसक्ती करण्यापूर्वी शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.