मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत रविवार (४ सप्टेंबर) रामलीला मैदानावर महा रॅली काढण्यात येणार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाचा जामीन फेटाळला

Punes air is toxic during Diwali Shocking findings in Maharashtra Pollution Control Boards inspection
दिवाळीत पुण्यातील हवा विषारी! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष
Maval votes, Maval Pattern, Maval voting,
मावळमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? मावळ ‘पॅटर्न’चे काय होणार?
sharad pawar Ajit Pawar injustice statement maharashtra vidhan sabha election 2024
चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल
Response to voting in morning session in Chinchwad 17 percent voting till 11 am
चिंचवडमध्ये सकाळच्या सत्रात मतदानाला प्रतिसाद; ११ वाजेपर्यंत १७ टक्के मतदान, किती मतदारांनी बजावला हक्क?
Low turnout for voting in morning phase in Pimpri How much voting in first four hours
पिंपरीत सकाळच्या टप्यात मतदानाला अल्प प्रतिसाद; वाचा पहिल्या चार तासात किती मतदान?
Rupali Chakankar talk on Ajit pawar, Rupali Chakankar latest news, Rupali Chakankar marathi news,
अजितदादा लाखांच्या मताधिक्यानी निवडून येतील – रुपाली चाकणकर
Case registered for spreading defamatory content on social media
पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
Case registered for assaulting Chandrakant Tingre
चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
Vidhan Sabha Election 2024 How much voting in Bhosari Vidhan Sabha Constituency Pune news
चुरशीची लढत असलेल्या भोसरीत पहिल्या चार तासात किती मतदान?

सध्याच्या कठीण काळात काँग्रेस जनतेबरोबर आहे आणि राहील.मोदी सरकारची धोरणे विनाशकारी आहेत. गेल्या आठ वर्षांत अशा चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलिंडर, तेल, कडधान्ये यांचे भाव वाढलेले आहेत. महागाईच्या झळा सोसत सण साजरे केले जात आहेत. या बिकट परिस्थितीच्या विरोधात २०२१ च्या जून महिन्यापासून काँग्रेसने देशभरात संसदेपासून अगदी रस्त्यावर आंदोलने करून जनतेचे गाऱ्हाणे मांडून मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीत महारॅली आयोजित केली आहे. भारतभर चाललेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस सातत्याने सहभागी झाली आहे,असे मोहन जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास ,कात्रजमधील घटना

जोशी म्हणाले की, दिल्लीतील महा रॅली मध्ये महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला जात असून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत, पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलने करुन यापूर्वी सातत्याने निषेध नोंदविला आहे.