पुणे : देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आपल्या राज्यात देखील अद्याप ही प्रत्येक राजकीय पक्षा कडून उमेदवाराची चाचपणी सुरूच आहे. त्याच दरम्यान मागील आठवडय़ात महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार अशी चर्चा होती.

हेही वाचा >>> पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : दादांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का? अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या….
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nagpur evm machines marathi news
ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
Amol Khatal
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा आमदार खास टोपी घालून विधान भवनात; म्हणाले, “ही टोपी…”
MNS candidate sandesh desai in Versova gets same number of votes both times 2019 and 2024
वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते
Balasaheb Thorat On Congress
Balasaheb Thorat : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपयश का आलं? बाळासाहेब थोरातांचं सूचक भाष्य; म्हणाले, “पराभवाची कारणं…”
Voter Count Shot Up by 74 Lakhs After Polls Closed In Maharashtra
पहिली बाजू : ‘त्या’ ७४ लाख मतांची उकल…
avinash brahmankar
कोण आहे ‘मतदारांच्या मनातील आमदार’…साकोलीतील फलकाची जोरदार चर्चा

पुण्याच्या उमेदवारीसाठी मोहन जोशी,अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्या सह २० जण इच्छुक होते.त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र अखेर आज काँग्रेसकडून सात उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर यांच्यासोबत संवाद साधला असता ते म्हणाले की,मी आजवर १० निवडणुका लढवल्या आहेत.त्या प्रत्येक निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहून मला विजयी केले आहे.

हेही वाचा >>> भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर

पुणे लोकसभा निवडणूक ही जनतेची असून चुरशीची होणार नाही. मागील दहा वर्षात भाजपचा कारभार जनतेने पहिला आहे.त्या कारभाराला देशातील जनता वैतागली आहे.ही पुणेकरांची लढाई असून ही लढाई पुणेकर जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मी पुणेकर नागरिकांचा उमेदवार असणार आहे.पण आज एक सांगू इच्छितो की,मागील दहा वर्षांत सर्व सामान्य नागरिकांना भाजप फसवित आले आहे.तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला फसविणार हे मात्र निश्चित अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Story img Loader