नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणा-या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून  प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: जिल्ह्यातील ३३ गावांत ‘नमामि चंद्रभागा’ अभियान; सांडपाणी, घनकचरा प्रकल्प प्रस्तावित

श्रीरामांचे अस्तित्वच नाकारण्यापासून सुरुवात करत आता राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी करून श्रीरामांचे अवमूल्यन करण्याचा आणि हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे गांधी परिवारापुढे गुडघे टेकण्याच्या लाळघोट्या राजनीतीची अधोगती आहे, असेही मोहोळ यांनी  म्हटले आहे.

हेही वाचा >>> पुणे: पीएमआरडीएच्या भूखंडांच्या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती

माजी केंद्रीय  मंत्री सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची केलेली प्रशंसा म्हणजे गांधी  घराण्याचे तळवे चाटण्याच्या स्पर्धेत पुढे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेसचे सर्वच नेते गांधी घराण्यासमोर लाळघोटेपणा करण्यासाठी चढाओढ करत असतात. पण त्याकरिता राहुल गांधींना श्रीरामांची उपमा देणे हा प्रभू रामचंद्रांचा अपमान आहे. सर्व गुणांचा आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. श्रीरामांचे अस्तित्व नाकारून हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविणाऱ्या, श्रीरामांच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्हे उमटविणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्या काँग्रेसने राजकारणासाठी हिंदूंच्या पवित्र श्रद्धास्थानांना वेठीस धरून आपल्या कर्तृत्वहीन नेत्यांची तुलना त्यांच्याशी करीत हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करू नये, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी करून केवळ हिंदूंच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भावना काँग्रेसने दुखावल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress should apologize for comparing rahul gandhi with lord ram says bjp murlidhar mohol pune print news apk 13 zws