पुणे : स्वात्र्यंतोत्तर ‘प्रजासत्ताक भारताचे’ सत्यमेव जयते या अर्थपूर्ण ‘राष्ट्रीय ब्रीद’ सह तयार झालेले बोधचिन्ह हे भारताच्या लोकशाहीरूपी संविधानात्मक वाटचालीची दिशा आणि संकेत दर्शवणारे असून ‘सत्यमेव जयते’ ब्रीद चा उल्लेख नसताना ‘अशोक स्तंभाचे’ अनावरण कसे करण्यात आले, अशी विचारणा काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
तिवारी म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारताची निर्मिती १९४७ ला झाल्यानंतर १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक भारताची’ जगासमोर ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, आदींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह घटना-समितीने मोठ्या कालावधीनंतर विचार विमर्षाने संविधान दिले. प्रजासत्ताक भारताचे ‘सत्य मेव जयते’ हे अर्थपूर्ण ब्रीद निश्चित करून, त्यावर ३ सिंहाची प्रतिमा बसवून संविधानाचे बोधचिन्ह दिले. मात्र भाजप नेतृत्वाने मुळात मनमानीपणे हजारो कोटींचा खर्च करून ‘सेंट्रल व्हीस्टा’ च्या रूपाने ‘नवे संसद भवन, पंतप्रधान कार्यालय आणि निवास स्थान’ कोरोना संकट काळातच बांधण्याचा घाट धातला यावर मुळात अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक बाबतीतच ‘राजकीय श्रेय’ घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्यमेव जयते’ या राष्ट्रीय ब्रीद वाक्याचे वावगे काय आहे, अशी विचारणा तिवारी यांनी केली.