बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चिंचवड आणि कसबा येथील पोटनिवडणुकांच्या दृष्टीने ते आमचे ‘स्टार प्रचारक’ आहेत. तांबे कुटूंबातील वाद हा त्यांचा आंतर्गत कौटुंबिक विषय होता. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्या प्रकरणात कारवाई केली आहे, त्यामुळे आम्ही कोणी त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुण्यात केले आहे.
हेही वाचा- ‘आम्ही दाबणार ‘नोटा’; पुण्याच्या कसब्यातील फलकाची शहरात चर्चा
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकींच्या प्रचारासाठी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यासह देशातील विविध घडामोडींवर पटोले यांनी आपले मत व्यक्त केले.