भारतीय जनता पक्षाकडे पैसे, समाजमाध्यमे असे सगळेच आहे. त्यामुळे ते अगदी देशही विकत घेऊ शकतात. त्यांनी खुशाल सशासारखे धावत पुढे जावे, आम्ही कासवगतीने मात्र जनतेच्या आशिर्वादावर पुढे जाऊ, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “बाळासाहेब थोरात आमचे स्टार प्रचारक”; पुण्यात पोटनिवडणूक प्रचारादरम्यान नाना पटोलेंचं विधान

चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकींच्या प्रचारासाठी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यासह देशातील विविध घडामोडींवर पटोले यांनी आपले मत व्यक्त केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देशाचे पंतप्रधान दोन वेळा प्रचारासाठी येतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकांसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा येतात, यावरुन भारतीय जनता पक्षाच्या मनातील धाकधुक स्पष्ट आहे, असेही पटोले यावेळी म्हणाले.