चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस ने देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. चिंचवड पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास आम्ही त्यांचे काम करू. पक्षाने ऐकला चलो चा नारा दिल्यास आमची ऐकला चालण्याची तयारी आहे. अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यास तयार असून अंतिम निर्णय राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे घेणार आहेत. मात्र, आता काँग्रेस देखील पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- पुण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह नीरा नदीत सापडला; सहकारनगर पोलिसांकडून तपास सुरू
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकतेच निधन झाले आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी आश्विनि जगताप किंवा बंधू, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी देखील ही निवडणूक लढवण्यास आग्रही असून तशी तयारी राष्ट्रवादी ने केली आहे. अंतिम निर्णय शरद पवार हे घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे. आता या पोटनिवडणूकीत काँग्रेस देखील उडी घेतली असून ते तयारी करत आहेत.
हेही वाचा- पुणे : हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल
काँग्रेस ची शनिवारी बैठक पार पडली यात चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठराव झाला आहे. निवडणूक लढवण्यास कार्यकर्ते आग्रही आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास त्याचे काम करू, पण पक्षाने ऐकला चलो ची भूमिका घेतल्यास तशी आमची तयारी असल्याचे देखील कदम यांनी स्पष्ट केले आहे. उद्या याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याशी चर्चा करणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले आहे.