लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या कट दहशतवाद्यांनी रचला होता. आयसिसच्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सिरीयातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.

shah rukh Saif Ali Khan
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या मानेवरील जखमांचे फोटो आले समोर; नेटकऱ्यांनी केला पब्लिसिटी स्टंटचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
mumbai railway 2006 blast case Appeal Against Conviction bombay high court
मुंबई उपनगरीय लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : दोषसिद्ध आरोपींच्या उच्च न्यायालयातील अपिलावरील सुनावणी पूर्ण

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली. एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोढव्यातू पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली. तेव्हा पुण्यात साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सिरीयातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीत दिली.

दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात कारवाया करण्याचा कट रचला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

आणखी वाचा-फटाके सोडाच, अगरबत्तीही जाळू नका! पुण्यात वायू प्रदूषण वाढलं; आरोग्य विभागाने दिले ‘१३’ महत्त्वाचे सल्ले

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) अशी आराेपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. कोंढव्यात आरोपी साकी, खान, आलम वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तपासात तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे साेपविण्यात आले होते. दहशतवाद्याकडून पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाँम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Story img Loader