वर्गणी देण्यावरुन झालेल्या वादातून बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. या प्रकरणी एकास अटक करुण्यात आली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्या आले आहे. चंद्रकांत रामचंद्र मोरे ( वय ४४ , रा. प्रचिती अपार्टमेंट, कीर्तीनगर, वडगाव) असे गंभीर जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जीवन सुरेश पवार (वय २०, रा. भिकोबा मोरे चाळ, उत्तमनगर ) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पवारबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. मोरे बांधकाम व्यावसायिक आहेत. उत्तमनगर भागातील अहिरे गेटजवळ मोरे यांचे कार्यालय आहे. जीवन आणि त्याचा साथीदार मोरे यांच्या कार्यालयात वर्गणी मागण्यासाठी गेले होते.

हेही वाचा : पिंपरी : धनादेशाद्वारे देयके न देण्याचा पिंपरी पालिकेचा निर्णय ; ‘ईसीएस’ प्रणालीचा वापर बंधनकारक

वर्गणी देण्यावरुन मोरे आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर पवार आाणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदाराने मोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करुन दोघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, उपनिरीक्षक गणेश माने यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी पवार आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.

Story img Loader