पिंपरी : पोकलेनच्या साहाय्याने सुरू असलेल्या खोदकामाचा जाब विचारल्याने बांधकाम व्यावसायिकाला मारहाण झाल्याची घटना सुसगाव येथे घडली. याप्रकरणी प्रशांत शंकर जाधव ( वय ४८, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका माजी नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सुसगाव येथील जाधव यांच्या मालकीच्या जागेत पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम करीत होते. त्यामुळे जाधव आणि विजय रौंधळ तिथे गेले. त्यांनी आरोपींना खोदकाम करण्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपींनी ‘तू कोण विचारणारा’ असे म्हणत जाधव यांना कानशिलात मारली. तसेच रौंधळ यांना ढकलून खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. दगड फेकून मारले. महिला पोलीस निरीक्षक तेजस्वी जाधव तपास करीत आहेत.
First published on: 28-01-2025 at 08:37 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction worker in susgaon beaten for inquiring about ongoing digging with poklen pune print news ggy 03 sud 02