पिंपरी : चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह आठ वाहनांना धडक दिली.यात एका लहान मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने वेळेतच वाहनातून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून चोप दिला आहे.ही घटना गुरुवारी ( १६ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव चौकात घडली.दरम्यान,कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी नेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत माहिती अशी कि,चाकण येथून शिक्रापूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने तळेगाव चौकात एका दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवर दोन महिला आणि एक ११ वर्षीय मुलगी जात होत्या.कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला आणि मुलगी रस्त्यावर पडल्या.मुलीच्या पायावर कंटेनरचे चाक गेले आणि त्यात ती गंभीर जखमी झाली.अपघात झाल्यानंतर कंटेनर शिक्रापूरच्या दिशेने निघून गेला. तसेच तो रस्त्यात आणखी वाहनांना धडक देत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली.

चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह आठ वाहनांना धडक दिली.यात एका लहान मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

हेही वाचा >>>सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक

कंटेनरने पुढे जात असताना सुरुवातीला एका कारला धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले.अपघात झाल्यानंतर थांबण्याऐवजी चालकाने कंटेनर तसाच पुढे नेला. त्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अंतर्गत असलेल्या शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाजेवाडी येथे कंटेनर चालकाला पकडण्यात यश आले. दरम्यान कंटेनरने सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. चाकण आणि शिक्रापूर पोलिसांनी वाजेवाडी येथे रस्त्यात डंपर आडवा लावून कंटेनर अडवला. त्यानंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला चांगला चोप दिला. त्यात कंटेनर चालक जखमी झाला आहे. कंटेनरने पोलिसांच्या वाहनाला देखील धडक दिली असून त्यामध्ये एक वॉर्डन जखमी झाला आहे.

हेही वाचा >>>पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी

ट्रक प्रथम एका कारला धडकला आणि नंतर पाठलाग करताना इतर वाहनांना धडकला. सात वाहनांना धडक दिल्याची पुष्टी झाली आहे.आम्ही आणखी काही नुकसान झाले आहे का याचा तपास करत आहोत. चाकण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, हे तपासण्यासाठी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container hits eight vehicles including police car on chakan shikrapur road pimpri pune print news ggy 03 amy