शहर अभियंत्यांकडून चौकशीचे आदेश
पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतच गेल्या चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहर अभियंता महावीर कांबळे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, इमारतीतील पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
शनिवारपासून पालिका मुख्य इमारतीत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्रास झाला. काहींना उलटय़ा व जुलाबही झाले. त्यामुळे दोन दिवस कर्मचारी घरून पाणी आणत होते. काहींनी खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरून विकत पाणी आणले. या प्रकाराबाबत काही पत्रकारांनी कांबळे यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश देऊन पाणी तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, पालिकेतील उपाहारगृहचालकांची चंगळ झाली. मोठय़ा प्रमाणात पाण्याच्या बाटल्यांची विक्री तेथे झाली. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत होते. तरीही नागरिकांनी बाहेरून आणलेले पाणी पिणेच सोयीस्कर मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा