पुणे : ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बप्पा (रा. मुदगड, जि. लातूर) विक्रम जाधव (रा. अंबुलगा जि.लातुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरेखा राजेंद्र चव्हाण (वय ३७, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण ठेकेदार आहेत. ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवितात. बप्पा याने राजेंद्र यांना ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते.

हेही वाचा…पुणे: पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल अगरवालसह भावावर आणखी एक गुन्हा दाखल

राजेंद्र यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाहीत. त्यामुळे बप्पा आणि जाधव चिडले होते. हडपसर भागातील मंत्री मार्केट परिसरातून राजेंद्र यांना मारहाण करून आरोपींनी धमकावले. त्यांना मोटारीत घालून आरोपी पसार झाले. आरोपींनी पतीला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याची फिर्याद सुरेखा यांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor kidnapped over sugarcane worker dispute in pune s hadapsar area police investigate pune print news rbk 25 psg
Show comments