पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात झाली. सध्याची राष्ट्रीय, सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या पहिल्या दिवशी चर्चेबाबत गुप्तता ठेवण्यात आली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठकीसाठी उपस्थित असून, देशातील भाजपच्या ताकदीचे चित्र ते या बैठकीत मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात  या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली. या बैठकीस संघ परिवाराशी संबंधित ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या बैठकीचा समारोप शनिवारी (१६ सप्टेंबर) होणार आहे. या बैठकीत संघाच्या विचारधारांशी प्रेरित संघटना त्यांचा कार्य अहवाल मांडणार असून, पुढील वर्षभरात संघटनेची दिशा काय असेल, याची माहिती देणार आहेत. राम मंदिर, समान नागरी कायदा, आरक्षण या विषयांबरोबरच देशातील राजकीय परिस्थिती, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दय़ांवरही या बैठकीत ऊहापोह होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coordination meeting of sangh parivar in the presence of bjp leaders ysh
Show comments