लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी निलंबित | cop suspended after woman alleges rape on marriage lure pune print news vvk 10 zws 70
पतीपासून वेगळी राहत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला तसेच तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हा आदेश दिला. कादिर कलंदर शेख आणि समीर पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा >>> येरवडा कारागृहात कैद्यांकडे पुन्हा दोन मोबाइल सापडले
तरुणी पतीपासून वेगळी राहत होती. तिला एक मुलगा आहे. पीडित तरुणी आणि आरोपी कादिर शेख यांची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. शेखने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तिला लष्कर भागातील एका उपाहारगृहाजवळ बोलवून आरोपी कादिर शेख, समीर पटेल आणि दोन साथीदार तसेच बुरखा परिधान केलेल्या महिलेने मारहाण करून तिचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख तपास करीत आहेत.