कृष्णा पांचाळ | पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला असून याचा संसर्ग आता कोठडीतील आरोपीपर्यंत पोहचला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपी करोना विषाणूने बाधित झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, त्याच्या सोबत किंवा सानिध्यात आलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी २५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या २५ वर्षीय आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायलायने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला शहरा बाहेरच्या कारागृहात पाठवून देण्यात आलं असून तो करोना विषाणूने बाधित असल्याचं समोर आलं आहे. परंतु, तो पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बाधित झाला नसल्याचं सूत्रांच म्हणणं असून कारागृहात गेल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असं त्यांनी स्पष्ट केल आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतांना स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. आरोपीच्या हाताला दोरखंड बांधून सोशल डिस्टसिंग ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांचं स्वतः च करोना पासून रक्षण होईल.