पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या त्या गावातून दहा पालख्या पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर वारकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमी वर आषाढी वारी पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे म्हणाले, ‘पायी वारीबाबत शासनाचा निर्णय झाल्याची अधिकृत प्रत अद्याप मिळालेली नाही. वारकऱ्यांच्या आणखी काही मागण्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मांडू.’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in