पिंपरी : करोना योद्धा महिला बचत गटाने घरगुती गणेशोत्सवात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकर्षक देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले, अशा महिलांना एकत्र करून महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत उमेद जागर उपक्रमाअंतर्गत करोना योद्धा महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे. थेरगाव येथील या करोना योद्धा महिला बचत गटातील महिलांनी गणेशोत्सवातील बहिण भावाचा महत्वपूर्ण सोहळा असलेल्या गौरी-गणपती सजावट पूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा आकर्षक देखावा साकारला आहे. या देखाव्यात गौरी अर्थात लाडक्या बहिणी या राज्यशासनाच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. ही संकल्पना आणि प्रत्यक्ष देखावा करोना योद्धा महिला बचत गटातील सदस्या मीना चौधरी आणि सहकाऱ्यांनी साकारला असल्याची माहिती समूह संघटिका वैशाली खरात यांनी दिली आहे.

हे ही वाचा…Ajit Pawar : दिलीप मोहितेंना लाल दिव्याची गाडी देणार? आळंदीत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; जागावाटपावरही केलं भाष्य

करोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले अशा महिलांना महापालिकेमार्फत सिंबायोसिस विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत थेरगाव येथे महिला करोना योद्धा महिला बचत गटाचे युनिट स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी महिलांना जागा उपलब्ध करून देण्यासोबतच शिवणयंत्रे व इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना उत्पन्नाचे साधन मिळवून देऊन महापालिकेने त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.

हे ही वाचा…बजाज आलीयान्झ कंपनीची व्यवस्थापकाकडूनच दीड कोंटीची फसवणूक

दरम्यान, राज्य शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना महत्वकांक्षी आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. राज्यभरात योजनेची जोरदार चर्चा आहे. आता गणेशोत्सवात देखील या योजनेसंदर्भात देखावे सादर केले जात असल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona fighter woman group created decoration of ladki bahin yojna in home ganeshotsav pune print news ggy 03 sud 02