पुणे : करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शाळांना देण्यात आलेली सुटी ही पालकांसाठीची चांगली संधी आहे. या सुटीच्या काळात मुलांचा टीव्ही, मोबाइलचा वापर कमी करून त्यांना वाचनाची आवड लावण्याची, त्यांना स्वतंत्रपणे खेळू देण्याची, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्याची चांगली संधी आहे, असे बालतज्ज्ञांचे मत आहे.

‘किती वेळ घरात किं वा टीव्हीसमोर बसणार आहेस,’ ‘जरा बाहेर जा खेळायला’ असे घरोघरी उन्हाळ्याच्या सुटीत ऐकू  येते. मात्र, करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, मैदानावर जाऊ देणेही शक्य नाही. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या सुटीच्या काळात मुलांचे काय करायचे असा पालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या सुटीकडे पालकांनी सकारात्मक दृष्टीने पाहून पालकांनीही चौकटीबाहेरचा विचार करावा. जेणेकरून मुलांनाही नव्या गोष्टी शिकायला मिळतील.

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले म्हणाले, की वयोगटानुसार मुलांच्या कृती बदलत असतात. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना नवे शोधायचे असते. पाच ते दहा वर्षांच्या मुलांना अनुभव घ्यायचा असतो. तर दहा वर्षांपुढील मुलांना काहीतरी प्रयोग करायचा असतो, आव्हान हवे असते. वयोगट कोणताही असला, तरी मुलं रोज तेच खेळ खेळणार नाही. त्यामुळे रोज खेळण्यात वेगळेपण आणण्यासाठी काय करायचे याचा विचार करून पालकांनी मुलांना खेळू द्यावे. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून त्यांना वाचन, कृतियुक्त खेळ, कु टुंबातील व्यक्तींची ओळख, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे असे काही उपक्रम करता येऊ शकतात. आजूबाजूच्या गोष्टींवर मुलांना विचार करायला लावला पाहिजे. मुलांना ‘एंटरटेन’ करणे हा विचार न करता त्यांना स्वतंत्र करण्यावर भर द्यावा. मात्र, एकटे खेळू देताना काही अपघात होणार नाही याकडे लक्ष ठेवावे.

‘पालकत्व म्हणजे मुलांना चोवीस गुंतवणे, त्यांच्याशी खेळत राहणे नाही. पालकांकडून मुलांचा अनावश्यक बाऊ के ला जातो. मुलांना सोबत घेऊन किं वा त्यांना स्वतंत्रपणे घरातील साफसफाई करायला सांगणे असे काही करणे शक्य आहे.

मुले स्वत: काही खेळ शोधू शकतात. प्रत्येक वेळी मुलांकडे लक्ष दिलेच पाहिजे असे नाही. संगणक, मोबाइल वापरणारी मुले असल्यास त्यांना शिकण्यासाठीचे व्हिडिओ दाखवता येऊ शकतात. मात्र, अचानक आलेली सुटी मुलांना स्वतंत्र करण्यासाठी, त्यांना स्वत: काही करू देण्यासाठीची संधी आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे,’ असे बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी सांगितले.

‘सुटीच्या काळात पालकांनी मुलांशी संयमाने वागल्यास मुलांशी असलेले नाते चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकते. पालकांनी आपले काम करताना मुलांना वेळ दिल्यास मुलांनाही आनंद वाटेल. आजच्या काळात हरवलेला संवाद, मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येऊ शकते,’ असे समुपदेशक पर्णिका कु लकर्णी यांनी सांगितले.

सुटीत पालक मुलांकडून काय करून घेऊ शकतात?

  •  घरातील साफसफाई करू देणे
  •  स्वयंपाक घरातील कामे दाखवणे
  • रद्दी बांधणे, के र काढणे, झाडांना पाणी घालणे अशी कामे देणे
  •  ओरिगामी, हस्तकौशल्ये शिकवणे
  •  व्यायामप्रकारांची ओळख करून देणे
  • कात्रणांची चिकटवही करून घेणे
  •  वाचनाची गोडी लावणे

Story img Loader