सायरस पूनावाला यांची खळबळजनक स्पष्टोक्ती
पुणे : करोना लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे राजकारण्यांनी जाहीर केलेले वेळापत्रक म्हणजे निव्वळ थाप आहे, अशी स्पष्टोक्ती सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी शुक्रवारी केली. जगातील १५० देश लशीच्या प्रतीक्षेत असल्याने लशीच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणीही डॉ. पूनावाला यांनी केली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मानाने डॉ. पूनावाला यांना गौरवण्यात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोना, टाळेबंदी आणि लशीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर डॉ. पूनावाला यांनी भूमिका मांडली. डॉ. पूनावाला म्हणाले, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत. लशींचे उत्पादन पाहता ते अवघड आहे. आम्ही अन्य वीस लशींचे १५ कोटींपर्यंत उत्पादन करीत होतो; पण सध्या बाकी लशींचे उत्पादन कमी करून करोनाच्या एकाच लशीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. मृत्युदर जास्त असताना टाळेबंदी हा उत्तम उपाय आहे; पण सध्या मृत्युदर कमी असल्याने टाळेबंदीची आवश्यकता नाही. सतत टाळेबंदी करणे चुकीचे आहे. टाळेबंदी नसल्यास लोकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होण्यास मदत होईल.
मोदी सरकारने लशीच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. १५० देश लशीच्या प्रतीक्षेत आहेत. लशी पुरवण्यासाठी आम्ही पैसे घेतले आहेत; पण सरकारच्या निर्यातबंदीमुळे लस निर्यात करता येत नाही. सरकारने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी डॉ. पूनावाला यांनी के ली.
…तरी सीरम इन्स्टिट्यूट बांधली
मुलांसाठीची लस आणि शाळा सुरू करण्याबाबत डॉ. पूनावाला म्हणाले, की मुलांसाठीच्या नोव्होव्हॅक्स लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलांसाठी लस उपलब्ध होईल. कोविशिल्ड लस १२ वर्षांखालील मुलांना देता येणार नाही. ते धोकादायक ठरेल. मुलांना वर्ष-दोन वर्षं घरी राहून अभ्यास करता येईल. मी कॉलेजमध्ये असताना वर्गात जात नव्हतो, पवारसाहेब वगैरे मला हसायचे. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली….
तिसरी लाट मोठी नसेल…
’करोनाचा आजार कमी होईपर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना पुन्हा लस घ्यावी लागू शकते.
’तिसरी लाट येण्याची शक्यता असली, तरी काही लोकांना समूह प्रतिकारशक्तीमुळे संरक्षण मिळेल, लस घेतलेल्यांना लशीमुळे संरक्षण मिळेल.
’ पण तिसरी लाट तितकी मोठी नसेल असे मला वाटते. माझा धंदा कमी झाला तर मी खूश आहे, असे त्यांनी सांगितले.
पुण्याला जास्त लस द्यायची होती, पण…
पुण्यामध्ये करोनाचा संसर्ग जास्त असल्याचे आकडेवारीतून दिसून आल्याने, सीरम इन्स्टिट्यूट पुण्यातच असल्याने पुण्याला जास्त लस पुरवण्याबाबत मोदी सरकारला सुचवले होते. मात्र त्याबाबत ते काहीच बोलत नाही, असे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.
लशीची तिसरी मात्रा… लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांचे प्रमाण कमी होत असल्याबाबत ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाबाबत डॉ. पूनावाला म्हणाले, लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर शरीरातील प्रतिपिंडे कमी होत असून लशीच्या दोन मात्रांनंतर सहा महिन्यांनी तिसरी मात्रा (बुस्टर डोस) घ्यायला हवी. मी स्वत: आणि सीरममधील सात हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरी मात्रा दिली आहे. तिसऱ्या मात्रेनंतर काय परिणाम होतो याचा अभ्यास करायला हवा, असेही त्यांनी नमूद के ले.
आम्ही महिन्याला दहा कोटी लशींचे उत्पादन घेतले आहे. उत्पादनवाढीसाठी आम्ही हजारो कोटींची गुंतवणूक के ली. वर्षाला ११० ते १२० कोटी लशींचे उत्पादन आम्ही करतो. अन्य उत्पादक कं पन्या किती उत्पादन करतात ते पाहिल्यास डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणे शक्य आहे का, ते कळेल. – डॉ. सायरस पूनावाला