मेधा पाटकर यांचा आरोप   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : करोना ज्या प्रयोगशाळेतून निघाला, त्या वुहानमधल्या प्रयोगशाळेचा मालक मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हेच असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी मंगळवारी केला.

जगभरात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून करोनाचा कहर सुरू आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये करोनाचा प्रसार झालेला आहे. चीनमधल्या वुहानमध्ये या करोना विषाणूचा उगम झाला त्या प्रयोगशाळेचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून बिल गेट्स असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. त्यानंतर पाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटकर म्हणाल्या, बिल गेट्स फाउंडेशनने पूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करण्याचे ठरवले आहे. स्वत: अमेरिकेतल्या दोन लाख ४० हजार एकरांचा मालक गेट्स आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ७१५ शेतकरी शहीद झाले. त्याच तोमर यांनी गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिले आहे. शेतीचे औद्योगीकरण याला जबाबदार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection origin laboratories owned by bill gates akp