पुण्यातील नागरिकांच्या कानावर एक चांगली बातमी पडलेली असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात एका अंगणवाडी सेविकेच्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अंगणवाडी सेविकेचा पती एका हॉटेलवर मॅनेजर म्हणून कामाला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील पहिला करोना बाधित रुग्ण पुण्यात आढळून आला. त्यानंतर पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र, महिनाभराच्या उपचारानंतर करोनाचा संसर्ग झालेल्या या दाम्पत्याची प्रकृती बरी झाली आहे. त्यांना लवकरच सुटी दिली जाणार आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे. वडगाव बुद्रूक परिसरातील एका अंगणवाडी सेविकेच्या पतीला करोना बाधिताच्या संपर्कात आल्यानं लागण झाली. ही व्यक्ती बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या ४६ वर्षीय व्यक्तीला अचानक खोकल्याचा त्रास सुरू झाला. या व्यक्तीला करोनाची कुठलीही लक्षणं दिसून आली नाही. विशेष म्हणजे त्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे नमुने घेण्यात आले. हे नमुने एनआयव्ही सेंटरला पाठवण्यात आले. सोमवारी तपासणी अहवाल मिळाल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. पुणे महानगर पालिकेचे मुख्य सहाय्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव व्यवहारे यांनी ही माहिती दिली. ‘पुणे मिरर’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

‘करोनाची लागण झालेल्या या व्यक्तीनं मागील काही काळात कुठेही प्रवास केलेला नाही. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे आम्ही त्या रुग्णांचा शोध घेत आहोत. रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती डॉ. व्यवहारे यांनी दिली.

सात कुटुंबातील सदस्यांना नायडूमध्ये केलं दाखल

‘करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सोमवारपासून सुरू केलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सात कुटुंबातील सदस्यांना डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या स्रावाचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. घराच्या परिसरातील आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात २३ जण आले होते. त्यांची ओळख पटली आहे. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यातील काही जणांचे रिर्पोट निगेटिव्ह आले आहेत,’ अशी माहिती पुणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.