देशभरासह राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं रुग्ण संख्ये आघाडीवर दिसत आहेत. पुण्यात मागील 24 तासांत करोनाने 9 जणांचा बळी घेतला असून 111 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर १० मे ते १७ मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना राज्याचे उपमुख्‍यमंत्री आणि पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच शहरातील ज्‍या भागात करोनाबाधित रुग्‍ण अधिक आहेत तिथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्यायची असेल तर ती मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल असेही त्‍यांनी सांगितले.

Story img Loader