पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या सर्व रुग्णांवर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची १४ दिवसानंतर करण्यात आलेली पहिली चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफने यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तीन करोनामुक्त तरुणांना घरी सोडण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी तीन करोनामुक्त तरुणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. हे तिघेही दुबईहून पिंपरी-चिंचवड शहरात परतले होते. याच तीन पैकी एका तरुणाच्या कुटुंबातील चार व्यक्तींना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची १४ दिवसानंतरची पहिली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तर थायलंड येथून आलेल्या एका व्यक्तीचीदेखील पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.

काही दिवसांपूर्वी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे समजताच भोसरी रुग्णालयातून पलायन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रयत्नाने पोलिसांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी शोधून काढत पुन्हा रुग्णालयात दाखल केले होते. करोना बाधित पाच व्यक्तींची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या दुसऱ्या टेस्टचा अहवाल रात्री उशिरापर्यंत हातात येईल असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus five pimpri chinnchwad people first test negative after 14 days good news kjp 91 jud
Show comments