पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणू ने ऐकून १२ जण बाधित आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून शहरात निर्जंतुकीकरण करणं सुरू आहे. रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत हे काम सुरू असून अग्निशमन वाहनांनी याची फवारणी केली जात आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून एक ही करोना बाधित आढळलेला नाही. करोना चा प्रादुर्भाव होऊ नये हे लक्षात घेता आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला असून सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात ऐकून १२ करोना बाधित आढळल्यानंतर शहरातील प्रशासन खडबडून जाग झालं आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथे करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १२ पैकी ८ रुग हे ठणठणीत बरे झाले असून तीन जणांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. तर आज पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर करोना बाधित, संशयित आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या इमारतीमध्ये, परिसरात सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्सची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील पुढचे दिन दिवस ही फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येणार आहे. अग्निशमन जवान सरोष फुंदे , अमोल चिपळूणकर, लक्ष्मण होवाळे, संत तुकाराम नगर, भोसरी फायर स्टेशन, प्राधिकरण फायर स्टेशन, रहाटणी फायर स्टेशन, तळवडे फायर स्टेशन, चिखली फायर स्टेशन यांनी फवारणी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pimpri chinchawad spraying drugs in the area of %e2%80%8b%e2%80%8bcoroners suspects immigrants nck
Show comments