पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपला वाढदिवस साजरा न करता गरजू नागरिकांना अन्नधान्य, साखर तसंच डेटॉल साबण, ब्रश अशी आवश्यक असलेल्या सामग्रीचं वाटप केलं. जवळपास १०० कुटुंबाना ही मदत देण्यात आली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खरं तर करोनामुळे अनेक नागरिकांना एक वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालं आहे. अशातच त्यांनी दाखवलेली माणुसकी खूप महत्त्वाची आहे. गणेश सावंत असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते गुन्हे शाखा १ मध्ये कार्यरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश सावंत हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा १ चे पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मित्र साजरा करत असतात. परंतु, यावर्षी करोना विषाणूचं संकट सर्वांवरती घोंगावत असून अनेक जण यामुळे बाधित झाले आहेत. अनेकांचा रोजगार आणि दररोज मिळणारी मिळकत बंद झाली आहे. साहजिकच याचा परिणाम कुटुंबावर झाला असून एक वेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी गणेश यांनी वाढदिवस साजरा न करता ज्यांचा रोजगार गेलेला आहे आणि एक वेळच्या जेवणाची चिंता लागील आहे अशा १०० कुटुंबांना धान्य, तांदूळ, ब्रश, साखर, डेटॉल साबण अशी सामग्री दिली. यामुळे गरीब कुटुंबाला एक वेळचं जेवण मिळणार असून गणेश यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus police constable celebrate birthday with poor people kjp 91 sgy