देशामधील करोनाग्रस्तांची संख्या एक हजार ८०० हून अधिक झाली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ३०० हून अधिक झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून २४ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या काळामध्ये देशात लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येतील मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केलं जात आहे. असं असताना अनेकजण जीवनावश्यक वस्तू तसेच इतर कारणांसाठी घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहे. पोलिसांनी कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पोलीस रस्त्यावर कारवाई करत असताना दुसरीकडे पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र नेटकऱ्यांना त्यांच्या हटके भाषेत समजवण्यासाठी पुणे पोलिसांनीही अगदी भन्नाट कल्पना लडवली असून त्यांनी थेट पुणेरी उखाणे ट्विट करत पुणेकरांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा