राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पक्षाचे नगरसेवक बंडू केमसे अडचणीत सापडले असून केमसे यांचा जाहीर निषेध पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केला.
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमधील टेकडय़ांवर जैवविविधता उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण दर्शवण्यात आले असून राष्ट्रवादीतील एक नेत्या वगळता पक्षातील सर्वजण बीडीपीच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन केमसे यांनी रविवारी एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना केले होते. त्यांनी ही टीका शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यावर केल्यामुळे पक्षाचे सरचिटणीस गोविंद थरकुडे यांच्यासह माजी महापौर मोहनसिंग राजपाल आणि अनेक नगरसेवकांनी केमसे यांचा निषेध करणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या पत्रकावर आहेत.
शहराला चांगले पर्यावरण मिळावे यासाठीच बीडीपीचा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोध करणाऱ्यांचे हितसंबंध त्यात गुंतले असल्यामुळे स्वार्थापोटी ते दुसऱ्यांवर दोषारोप करत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporator kemse protested by rashtrawadi
Show comments