जमीन मोजणी प्रकरणात वीस हजारांची लाच; इंदापूर परिसरात कारवाई
जमीन मोजणी केल्यानंतर हद्द कायम ठेवण्यासाठी एकाकडून वीस हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.या प्रकरणी राजाराम दत्तात्रय शिंदे (वय ५४) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराच्या काकांची इंदापूरमधील निंबोडी गावात जमीन आहे. तेथील जमिनीची दोन महिन्यांपूर्वी मोजणी करण्यात आली होती. हद्द कायम ठेवण्यासाठी इंदापूरमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक राजाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजारांची लाच मागितली होती.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

तक्रारदाराने तडजोडीत वीस हजारांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची शहानिशा करुन इंदापूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच घेताना शिंदे यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज बनसोडे, सहायक आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप कऱ्हाडे तपास करत आहेत.