डॉ. रत्नाकर महाजन यांचे मत
भ्रष्टाचार हा देशविकासातील सर्वात मोठा अडथळा असून, जात ही देशातील भीषण समस्या आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
‘आपला देश घडतोय आणि बिघडतोय’ या विषयावरील व्याख्यानात महाजन बोलत होते. माजी नगरसेवक सतीश दरेकर, मानव कांबळे, राजेंद्र घावटे, विश्वनाथ महाजन, नामदेव जाधव, काशिनाथ नखाते, मल्हारी बोडके आदी उपस्थित होते. डॉ. महाजन म्हणाले, मागासवर्गीयांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी १९५२ मध्ये घटनादुरुस्ती करून आरक्षणाला सुरुवात झाली. आज आरक्षण धोरणाचे धिंडवडे निघाले आहेत. आरक्षणाच्या वेगवेगळय़ा मागण्या होत आहेत. त्या असमर्थनीय आहेत. दुर्दैवाने एकाही राजकीय पक्षाकडे त्याला ठाम विरोध करण्याचे धैर्य नाही. सध्याच्या काळात धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्यासारखी वाटते. असे असले तरी विकासातील सर्व अडथळे दूर सारून देश नक्कीच घडत राहील. देश घडण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. काही घटक आपला संकुचित राजकीय स्वार्थ मनाशी बाळगून ही प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, देश घडण्याचीच प्रक्रिया प्रबळ राहील. पौराणिक काळापासून आपल्या देशाचे नाव भारत आहे. हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा