पुणे : हवेली कृषि उत्पन्न बाजर समितीची निवडणूक तब्बल १९ वर्षांनंतर होत असून ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी सहकार पॅनल यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेवा सहकारी संस्था गटातील ११ जागा, ग्रामपंचायात गटात ४, व्यापारी व आडते गटात २ आणि हमाल, मापाडी गटातील १ जागेसाठी मतदान पार पडले. तसेच या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी असे दोन पॅनल एकमेकांविरुद्ध उभे आहेत.

हेही वाचा – पुणे: खराडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले

व्यापारी गटात १३ हजार १७४ मतदार, हमाल, तोलणार गटात २ हजार ७ मतदार, सहकारी सेवा संस्था गटात १९१८ मतदार आणि ग्रामपंचायत गटात ७१३ मतदार असे एकूण १७ हजार ८१२ मतदारांची संख्या आहे. तर त्यापैकी १२ हजार ८७७ जणांनी मतदान केले आहे. त्यामुळे एकूण ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे.

हेही वाचा – निगडीतील नाट्यगृहाच्या रूपाने गदिमांवरील अन्याय दूर, सुमित्र माडगूळकर यांची भावना

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी असे दोन पॅनल असून स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counting of votes for haveli agricultural produce market committee election has started svk 88 ssb