पुणे : राज्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोउद्योग मंडळ, कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि वन विभागाकडून मध उत्पादनासाठी विविध योजना राबविल्या जातात. पण, प्रत्यक्षात या चार विभागांमध्ये कोणताही समन्वय नाही. राज्यातील एकूण मधपाळ, एकूण मध उत्पादन आणि मध उत्पादकांची नोंदणी याबाबत सर्वच पातळ्यांवर सावळा गोंधळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत देशातील पहिल्या मध महोत्सवाचे १८ आणि १९ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. देशातील पहिला मध महोत्सव आयोजित करीत असल्याचा गवगवा एकीकडे केला जात असला तरीही राज्यातील एकूण मध उत्पादन, मधपाळांची संख्या, मधुमक्षिका पेट्यांची संख्या या बाबत कुठेही ठोस माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा >>> पिंपरीतील नामांकित बिल्डरविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; नियम आणि अटी प्रमाणे फ्लॅट दिले नसल्याने तक्रार

राज्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोउद्योग मंडळ, कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि वन विभागाकडून मध उत्पादनासाठी विविध योजना राबविल्या जातात. पण, या विभागाकडून कोणताही तपशील जाहीर केला जात नाही. मध उत्पादन, मधपाळ, मधुमक्षिका पेट्या यांची नोंद ठेवली जात नाही आणि आपल्या विभागातील माहिती अन्य विभागाला दिली जात नाही, त्यामुळे मध उत्पादनाच्या आकडेवारीविषय सावळगोंधळ दिसून येत आहे.

सद्य:स्थितीत खादी आणि ग्रामोउद्योग मंडळाच्या वतीने संस्थात्मक काम सुरू झाले आहे. पण, त्यांच्या कामाला अनेक मर्यादा आहेत. खादी मंडळाच्या वतीने राज्यातील १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९ मधपाळ शेतकरी मधमाश्यांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. २०२३ मध्ये १ लाख ६० हजार किले मध उत्पादन झाल्याची आणि त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होत असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. पण, अशी माहिती अन्य विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

मध उद्योगाबाबत नोंदी अद्ययावत करणार

राज्याचे एकूण मधउत्पादन किती, याचे ठोस उत्तर सांगता येत नाही. सरकारच्या विविध विभागांत समन्वय नाही. खादी व ग्रामोउद्योग मंडळाने मंडळामार्फत मध उत्पादन करीत असलेले मधपाळ, मधुमक्षिका पेट्या आणि मध उत्पादनांची नोंदणी सुरू केली आहे. भविष्यात सरकारच्या अन्य विभागाशी समन्वय साधून राज्यातील एकूण मधपाळ, मधुमक्षिका पेट्या आणि मध उत्पादनांच्या तपशिलाच्या अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी खादी व ग्रामोउद्योग मंडळ पुढाकार घेणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country s first honey festival to be organised in mumbai on january 18 and 19 pune print news dbj 20 zws
Show comments