पुणे : प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोलीतील एका लाॅजमध्ये घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सचिन गोकुळ शिंदे (वय ३०), कोमल सुनील बरके (वय २०, दोघे रा. खराडी, नगर रस्ता) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेचे ‘विना वाहन वापर’ धोरण देशात पहिले
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत उभारणार ८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय
सचिन आणि कोमल सोमवारी संध्याकाळी नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात असलेल्या नानाश्री हाॅटेलमध्ये आले होते. दोघांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आली. या घटनेची माहिती हाॅटेलमधील व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत सचिन आणि कोमल यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. दोघांनी आत्महत्या का केली, यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली नाही. ससून रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.