पुणे : विश्रांतवाडी भागातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन नुकतेच जप्त करण्यात आले. याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थ तस्करांकडून देण्यात आलेले अमली पदार्थ कुरिअर कंपनीतील कर्मचारी नशेबाजांना पोहोचवित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

विश्वनाथ कोनापुरे (वय ४८, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विश्रांतवाडीतील धानोरी भागात छापा टाकून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोंदजे, रोहित बेडे, निमेश आबनावे यांना अटक करण्यात आली हाेती. आरोपींनी मेफेड्रोन कोठून आणले, तसेच त्यांनी कोणाला विक्री केली यादृष्टीने तपास करण्यात आला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोनापुरेला अटक करण्यात आली. कोनापुरे एका कुरिअर व्यावसायिकाकडे काम करत होता. तो आरोपींच्या संपर्कात होता. आरोपींनी दिलेले मेफेड्रोन कोनापुरे नशेबाजांना घरपोहोच देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोनापुरेला अटक केली.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला
youth stabbed with sickle Bopodi, Bopodi area,
पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडी परिसरातील घटना

आरोपींनी पुणे शहर, तसेच परगावात मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader