पुणे : उद्योग, कंपन्यांमध्ये कार्यरत नोकरदारांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता येण्यासाठी, त्यांची कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी राज्यभरात अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक उपयोजन असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. मात्र, या अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रवेश झाल्याचे आकडेवारीवरून दिसत असून, नोकरदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नोकरदारांसाठी अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष वर्ग अध्यापन पद्धतीसह सायंकाळी किंवा उद्योग-कंपन्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अभ्यासक्रम राबवणे, नियमित अभ्यासक्रमच नोकरदारांसाठी लागू, ७५ किलोमीटरची मर्यादा, एकूण प्रवेशक्षमतेच्या किमान ३० टक्के जागा भरल्यासच अभ्यासक्रम सुरू अशा काही तरतुदी या अभ्यासक्रमांसाठी करण्यात आल्या. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करणे, काळानुरूप नवी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने हे अभ्यासक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यभरातील काही उच्च शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम सुरू केले. राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, क्षमतेच्या तुलनेत झालेले प्रवेश फारच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
हेही वाचा…शाळकरी मुलींचा पाठलाग करुन अश्लील कृत्य, पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल टेक्निकल कोर्स इन मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमासाठीच्या ३८५ जागांपैकी ३३ जागांवर प्रवेश झाले. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २२२१ जागांपैकी २७३ जागांवरच नोकरदारांनी प्रवेश घेतला. संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए लॅटरल एण्ट्री) अभ्यासक्रमाच्या २ हजार ८५१ जागांपैकी ४१ जागांवर प्रवेश झाले. तर, ‘लॅटरल एण्ट्री डायरेक्ट सेकंड इअर मॅनेजमेंट कोर्स’च्या ९ हजार ३७ जागांपैकी केवळ १ हजार ९५० जागा भरल्या आहेत.
नोकरदारांसाठीच्या अभ्यासक्रमांचे यंदा पहिले वर्ष होते. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रतिसादाविषयी उत्सुकता होती. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेतील अनुभवानुसार पुढील वर्षी या अभ्यासक्रमांची माहिती व्यापक प्रमाणात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. एआयसीटीईने अभ्यासक्रमांबाबत सर्व भागधारकांशी चर्चा केली असती, तर त्याचा सकारात्मक परिणाम झाला असता, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.
हेही वाचा…
पुरेशा प्रवेशांअभावी दोन अभ्यासक्रम सुरूच नाहीत
नोकरदारांसाठी मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक आणि मॅकेनिकल या तीन पदवी अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळाली होती. मात्र, इलेक्ट्रिक आणि मॅन्युफॅक्चरिंग या अभ्यासक्रमांना नोकरदारांचे पुरेसे प्रवेश झाले नाहीत. परिणामी, हे दोन अभ्यासक्रम यंदा सुरू होऊ शकले नाहीत. तर मॅकेनिकलसाठी उपलब्ध ३० पैकी १९ जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे नोकरदारांचा प्रतिसाद न मिळण्याबाबतच्या कारणांचा अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डी. एन. सोनावणे यांनी दिली.