पुणे :  राज्यातील सेमी इंग्रजी शाळांसाठी मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्याच्या या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यामध्ये शासनाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शासन धोरणानुसार आणि तरतुदीनुसार शिक्षक भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कात्रज प्राणिसंग्रहालयात चौशिंग्या, तरस आणि बिबट्या

एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वाधिक पदे  जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे. या पदांसाठी पवित्र संकेतस्थळावर ५ फेब्रुवारीपासून प्राधान्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १३ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४१ हजार ८०६ उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदवले असून, त्यातील १ लाख ३७ हजार ६३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम अंतिम केले आहेत. प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court directed to continue teachers recruitment process as per government policy and provisions pune print news ccp 14 zws