स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून ती बेदरकारपणे चालवत पुण्यातील तब्बल नऊ लोकांच्या बळीस कारणीभूत ठरलेल्या एसटी चालक संतोष माने याला पुण्यातील सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने संतोष माने याला फाशी देण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. न्यायालयाने गेल्या बुधवारीच संतोष मानेला या खटल्यात दोषी ठरवले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निर्णय दिला.
माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकातून बस पळवून नेत भरधाव वेगाने हाकली होती. त्यात त्याने ४५पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७जण जखमी झाले होते. माने हा मनोरुग्ण असून, त्याने हे कृत्य वेडाच्या भरात केल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. वेडेपणात एखादा गुन्हा केला, तर त्या व्यक्तीला कलम ८४ नुसार शिक्षा होत नाही. या कलमाचा फायदा मानेला द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. घटनेच्या अगोदर २३ व २४ जानेवारी २०१२ रोजी माने याची मानसिक स्थिती ठीक होती. बचाव पक्ष माने हा वेडा असल्याचा एकही पुरावा सादर करू शकलेला नाही. त्यामुळे माने याला खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली दोषी ठरविण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
निष्पाप व्यक्तींचा तो अखेरचा दिवस (घटनाक्रम)
स्वारगेट बस स्थानकावर २५ जानेवारी २०१२ रोजी नेहमीप्रमाणे गर्दी होती. फलाटावर सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-सातारा-पुणे ही बस लागली होती. इतक्यात संतोष मारुती माने याने बसमध्ये चढून आपल्याकडील मास्टर कीने बस चालू केली. हडपसर रस्त्याच्या बाजूने असलेल्या गेटमधून बाहेर काढत गोळीबार मैदान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेऊन गेला. त्याने बेदरकारपणे बस पळवत रस्त्यावरील ४५ पेक्षा जास्त वाहनांना उडवत नऊजणांचा बळी घेतला होता. ३७ जण या घटनेत जखमी झाले होते. यापैकी अनेक जण कामाला, कॉलेजला जात होते. तसेच रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जखमी व मृत्यूमध्ये समावेश होता. माने घेऊन जात असलेल्या बसला पोलिसांनी-नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. लष्कर भागात बीट मार्शलनी बसच्या चाकावर गोळीबार केला. पण मानेला अडविण्यात यश आले नाही. माने पूलगेट येथून लष्कर भागात गेला तेथून आतमध्ये फिरून कासेवाडी मार्गाने सेव्हन लव्हज चौकातून सरळ जात मुकुंदनगर येथील रस्त्याने लक्ष्मीनारायण चौकात आला. या चौकात पोलिसांनी पीएमटी बस आडवी लावून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मित्रमंडळ चौकातून सारसबाग चौकात सिंहगड रस्त्याला तो लागला. सिंहगड रस्त्यावर डिव्हायडर तोडून बस पुन्हा विरुद्ध दिशेला नेताना रिक्षाला मोटारीला उडविल्यामुळे बस थांबली. त्यावेळी एका तरुणाने मध्ये शिरून मानेला बाहेर खेचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
घटनेत मरण पावलेल्या व्यक्ती – पूजा भाऊराव पाटील (वय १९, रा. ससाणेनगर), राम ललीत शुक्ला (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), शुभांगी सूर्यकांत मोरे (रा. शुक्रवार पेठ), पिंकेश खांडेलवार (वय २८, रा. महर्षीनगर), अंकुश तिकोणे (वय ४६), अक्षय प्रमोद पिसे (वय २०, रा. लॉ कॉलेज रोड), मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड (वय ४६, आनंदनगर, सिंहगड रस्ता), श्वेता धवल ओसवाल (वय २८, रा. टिंबर मार्केट) व चांगदेव भांडवलकर (वय ५५). हे सर्व मृत पुण्यातील होते

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Story img Loader