संतोष माने खटल्यामध्ये माने हा मनोरुग्ण असल्याची खोटी साक्ष देणाऱ्या डॉ. दिलीप बुरटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास २२ एप्रिलपर्यंत न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.
माने खटल्यामध्ये न्यायालयात खोटी साक्ष देऊन बनावट कागदपत्रे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तुमच्यावर कलम १९३ प्रमाणे खटला का चालवू नये, अशी नोटीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी ८ एप्रिल रोजी डॉ. बुरटे यांना बजावली होती. त्यावर डॉ. बुरटे यांच्या वतीने अॅड. बीडकर यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. ती मान्य करत न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत त्यांचे म्हणे मांडण्यास मुदतवाढ दिली आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court gives extension period to dr burate for his say
Show comments