महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया शिवाजी गदादे यांचे नगरसेवकपद रद्द केलेल्या आदेशाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्यास ६ एप्रिलपर्यंत न्यायालयाने मुदत दिली आहे.
वयाचा बनावट दाखला दिल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया शिवाजी गदादे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी न्यायालयाने दिला. गदादे यांना पुढील सात वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरुद्ध गदादे यांनी वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देत न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अ‍ॅड संजीव पाषाणकर यांनी दिली.  

 

Story img Loader