पुणे : बांधकाम व्यवसाय दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांची यादी पुढील दोन महिन्यांत सादर करावी, असा आदेश या प्रकरणातील विशेष न्यायालयाने मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिला आहे. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आणि न्यायालयात जमा असलेली रक्कम किती आहे हेदेखील उघड करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर अनेक वर्ष परतावा न मिळाल्याने अनेक ठेवीदारांनी या गुन्ह्यात न्यायालयात जमा असलेली रक्कम समप्रमाणात परत मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचा अर्ज ठेवीदारांच्यावतीने ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर विशेष न्यायाधीश ए. सी. डागा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने दोन महिन्यांत यादी सादर करण्याचा आदेश मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांना दिला आहे.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

हेही वाचा – पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण

हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता या दाव्यातील शेकडो प्रलंबित अर्ज निकाली लावणे आवश्यक आहे. ठेवीदार आणि गुंतवणूकदारांनी तयार केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अशा दाव्याच्या सतत्येबद्दल न्यायालयाला कळवावे, असे आदेशात नमूद आहे.

१९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी देण्याची मागणी

ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी डीएसके यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील विशेष न्यायालयात केला आहे. सध्याच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तांची किमत ५७२ कोटी १२ लाख ९५ हजार ६० रुपये आहे. या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तांपैकी ज्या मालमत्तांवर कोणतीही बँक, शासकीय आणि निमशासकीय संस्था कंपनीची हरकत नाही, अशा मालमत्तांची चालू बाजारभावाप्रमाणे असलेल्या मूल्यांचा तक्ता नोंदणी महानिरीक्षकांकडून तत्कालीन विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

हेही वाचा – हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…

जप्त करण्यात आलेली किती रक्कम न्यायालयात जमा आहे याची माहिती मिळावी. तसेच ती रक्कम ठेवीदारांना समप्रमाणात मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ठेवीदारांना त्यांची गुंतवणूक परत मिळण्यासाठी हा अर्ज केला आहे. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास ठेवीदारांना काही रक्कम परत मिळू शकते. तसेच जप्त करण्यात आलेल्या १९५ मालमत्तांवर कोणताही बोजा नाही. त्यामुळे त्यांचा लिलाव झाल्यास मोठी रक्कम येणार आहे. त्यातून ठेवीदारांची गुंतवणूक त्यांना व्याजासह परत मिळू शकते. – ॲड. चंद्रकांत बिडकर, ठेवीदारांचे वकील