अध्यात्मासाठी आश्रमात येणाऱ्या महिलेला फसवून तिच्याबरोबर दुसरे लग्न करणाऱ्या महाराजाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. दुसऱ्या पत्नीला दरमहा वीस हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी दिला.
आंबेगाव येथे किशोर मंडलिक उर्फ दादामहाराज (वय ४५, रा. धनकवडी) यांचा शिवगोरक्ष आश्रम आहे. या ठिकाणी अध्यात्मासाठी येणाऱ्या महिलेशी त्यांची ओळख झाली. त्या महिलेला त्यांनी पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्याचे सांगितले. तिच्याकडून चार लाख रुपये घेतल्यानंतर त्या महिलेशी विवाह केला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान या महिलेने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगी आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अंतरिम पोटगी म्हणून या महिलेला मंडलिक यांनी पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या विरोधात अ‍ॅड. एन. डी. पाटील, अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पीडित महिलेला मंडलिक यांनी वीस हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा