पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि आवाजाची चाचणी करण्याबाबत (व्हॉइस लेअर ॲनॅलिसिस) दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) दाखल करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी याबाबतचे आदेश दिले. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात नमूद केले होते. कुरुलकर याने मोबाइल संचातील काही विदा (डाटा) नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो परत मिळवायचा आहे. कुरुलकर बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी व्हॉईस लेअर सायकोलाॅजिकल ॲनॅलिसिस चाचणी करायची आहे. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. मात्र, व्हाॅइस लेअर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते. असे ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले होते.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

हेही वाचा >>> पिंपरी: अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची दोन पक्ष कार्यालये, शरद पवार गटाच्या कार्यालयाचं होणार लवकरच उद्घाटन!

त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हॉइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले होते. दरम्यान, डॉ. कुरुलकरने या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला होता.

कुरुलकरचे वकील ॲड. ऋषिकेश गानू यांनी एटीएसच्या अर्जास विरोध केला होता. कुरुलकरच्या परवानगीशिवाय व्हॉइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी, पॉलिग्राफ चाचणी करणे संशयित आरोपीच्या अधिकारांच्या विरुद्ध आहे. कुरुलकरकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप, मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण करून डीआरडीओच्या समितीने याबाबतची कागदपत्रे एटीएसकडे सोपविली होती, असे ॲड. गानू यांनी सांगितले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एटीएसने दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा >>> देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

एटीएसला धक्का कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे एटीएसच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. कुरुलकर बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनॅलिसिस आणि पॉलिग्राफ चाचणी करायची आहे, असे एटीएसने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते. संबंधित अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने एटीएसला धक्का बसला आहे.

Story img Loader