सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी पर्यंत पोहोचले
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील म्हाळुंगे एमआयडीसी मधील व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात हत्येची सुपारी देणारा हा फिर्यादीचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलेल असून त्याच्यासह इतर एकाला उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे २० जानेवारी रोजी म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलास स्टील कंपनीचे मॅनेजर अजय विक्रम सिंग यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता.
यात ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या सूचनांचं पालन करण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे मॅनेजरचा चुलत भाऊ संग्राम उर्फ चंदन आनंद सिंग याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानेच गुन्हा केल्यास समोर आलं. हत्या करण्याच्या उद्देशाने चार कामगारांना बारा लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. संग्राम सिंग ने चार कामगारांना अजय सिंग यांचा फोटो दाखवला. त्या कंपनीचा पत्ता आणि गुगल लोकेशन देखील देण्यात आलं.
आरोपींनी घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर वेगवेगळ्या गाड्यांमधून कंपनीचे रेकी देखील केली होती. अजय सिंग याला मारण्याचा प्लॅन होता. अखेर या याप्रकरणी रोहित सुधन पांडे याला उत्तर प्रदेशामधून अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार हा फिर्यादी यांचा चुलत भाऊ असल्याचे उघड झाल आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.