सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आज (सोमवार) बूस्टर डोस बद्दल मोठं विधान केलं आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोस आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला लवकर निर्णय घेण्याचे देखील आवाहन केले असल्याची माहिती त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली.

“आम्ही बूस्टर डोसबाबत सरकारला आवाहन केले आहे. कारण, प्रवास करणे आवश्यक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोसची गरज असते. या संदर्भात सरकार अंतर्गत चर्चा करत आहे आणि बूस्टर डोसबाबत लवकरच धोरण जाहीर केले जाईल. कारण, अन्य देश देखील करत आहेत आणि आता याकडे लक्ष देण्याची आपली वेळ आहे.” असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर, “केंद्र सरकारने खूप चांगले काम केले आहे. मोदी सरकारने जवळपास सर्वांना दोन डोस दिले आहेत आणि आता बुस्टर देण्याची देखील वेळ आली आहे. आम्ही आवाहन केलं आहे आता ते निर्णय घेतील. ज्याप्रकारे आपला देश नव्या व्हेरिएंटला सामोरं जात आहे, आपल्या देशातील लसीकरण हे अन्य देशांच्या तुलनेत खूप चांगले आहे. अमेरिका, युरोपमध्ये मोठ्याप्रमाणावर रूग्ण आहेत आणि आपल्या देशात यासाठी कमी आहेत कारण आपण योग्य लस निवडली.” असं देखील अदर पूनावाला यावेळी म्हणाले.

तर, ”आपल्या देशातील लसींचा नव्या व्हेरिएटवर चांगला परीणाम झाला आहे. आपल्या लशी सकारात्मक काम करतात. पण, करोनाच्या पुढील लाटेसाठी बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आताच धोरण जाही करावं. पण बूस्टर देताना दोन लशींचे मिश्रण की तीच लस द्यायची हे ठरवायला हवं.” असंही यावेळी अदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.

Story img Loader