करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं अभ्यासामध्ये दिसून आलं आहे. त्यामुळेच तिसरा डोस घेण्याची गरज असल्याची माहिती पूनावाला यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिलीय. सहा महिन्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं निरिक्षण समोर आलं आहे. यावर पूनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या बुस्टर डोसचा पर्यायही सुचवला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोव्हिशिल्डच्या प्रभावासंदर्भात बोलताना पूनावाला यांनी मी स्वत: तिसरा डोस घेतला असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर कंपनीतील सात-आठ हजार कामगारांनाही आपण तिसरा डोस दिल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. “सहा महिन्यांनी लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस दिल्यानंतरचा मेमरी सेल कायम शरीरामध्ये राहतो मात्र लसीचा प्रभाव कमी होतो. मी स्वत: तिसरा डोस घेतलाय. सिरममध्ये जे सात-आठ हजार कामगार आहेत त्यांनाही आम्ही तिसरा डोस दिलाय,” असं पूनावाला म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहनही केलंय. “ज्यांना कोव्हिशिल्डची लस घेऊन सहा महिने झालेत त्यांना माझी विनंती आहे की तिसरा डोस त्यांनी घ्यायलाच पाहिजे,” असं मत पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> ‘सिरम’चे सायरस पूनावाला म्हणतात, “पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने…”
मी पैसा कमावायला बसलेलो नाही…
करोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. देवाचा कोप होईल या भीतीने काहींनी उपचार नाकारले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पण लक्षणे दिसताच लगेच उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल. मला लोकांच्या दु:खातून पैसे कमवायाचे नाहीत. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असंही ते म्हणालेत.
लॉकडाउन नको…
राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोविशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
नक्की वाचा >> राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात : सायरस पूनावाला
सरकारने प्रोत्साहन दिले…
पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलंय.
पुरस्काराचे स्वरुप काय?
माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. पूनावाला यांनी हा पुरस्कार त्यांची दिवंगत प्रिय पत्नी विलू यांना समर्पित केला. आत्तापर्यंत देशाविदेशात अनेक पुरस्कार मिळाले. पण लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार विशेष आहे. टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी काही नाही, अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी सर्वांचे आभार मानले.