पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसृष्टी प्रकल्पाची उभारणी करावी व त्यासाठी नियोजन सुरू करावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
पिंपरीत बाबासाहेबांचा पुतळा व उद्यान विकसित करण्यात आले आहे. सध्या ती जागा अपुरी पडते आहे. मागील बाजूचे क्षेत्र आरक्षित असून तेथील जागा उद्यानाच्या जागेत समायोजित करावी आणि तेथे भीमसृष्टी हा प्रकल्प साकारण्यात यावा. त्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांचे म्यूरल साकारावे. यासाठी जाणकार, तज्ज्ञांची निवड करून पुतळा समितीची स्थापना करावी आणि विभागप्रमुखांना कामाचे आदेश द्यावेत. १४ एप्रिल २०१४ ला डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे, या निमित्ताने भीमसृष्टीची घोषणा करून समाजबांधवांना संदेश देता येईल, असे कदम यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा