पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वायसीयम रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेह अदलाबदली झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह अदलाबदली केल्यामुळे नातेवाईकांनी संतप्त होऊन वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांच्या केबिनची तोडफोड केली आहे . ज्या व्यक्तींना स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह देण्यात आला, त्यांनी त्यांचे मयत नातेवाईक समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. या प्रकरणी अधिष्ठाता वाबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मृतदेह अदलाबदली करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद आहेत का?, उदय सामंत म्हणाले…

दापोडी येथे राहणाऱ्या वृद्ध स्नेहलता गायकवाड या अंगावर भिंत कोसळून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्यांचे कुटुंबीय खासगी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. दुसऱ्या दिवशी स्नेहलता म्हणून दुसऱ्याच महिलेचा मृतदेह गायकवाड कुटुंबियांना दाखवण्यात आला. तर, स्नेहलता यांचा मृतदेह दुसरेच व्यक्ती घेऊन गेले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. असे स्नेहलता गायकवाड यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cremation done another dead body mistaking for relative incident at ycm hospital pimpri chinchwad tmb 01 kjp
Show comments